‘वसप’च्या माध्यमातून महादेव माने यांनी मराठी साहित्यविश्वात एक दमदार पाऊल टाकलं आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन!
वेगवेगळ्या अंगाने मानवी नात्यावर वेळोवेळी वाईट परिस्थितीची जी छाया (वसप) पडते, त्याचंच शब्दरूप म्हणजे या कथासंग्रहातील दहा कथा. ही कथा ग्रामविश्वाचे अनेकानेक सूक्ष्म कंगोरे उलगडून दाखवते. या प्रत्येक कथेचा नायक पुरुष असला, तरी कथा कुठेही पितृसत्ताक होऊ न देण्याचं भान लेखकानं कसोशीनं पाळलं आहे.......